WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. दूर असेलल्या व्यक्तीलाही व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करुन त्याच्या संपर्कात राहता येतं. फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते. व्हॉट्सअॅपने असं कॉल रेकॉर्डिंग फीचर दिलेलं नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे युजर्स व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड करू शकतात. यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागेल.