लॅपटॉप सतत अनस्टेबल होत असल्यास, हा व्हायरसचा धोका असू शकतो. अचानकपणे लॅपटॉपमध्ये विचित्र मेसेज येत असल्यास किंवा एकही ड्राइव्ह योग्यरित्या अॅक्सेस करता येत नसल्यास हे व्हायरसचे संकेत असू शकतात. नेहमी लॅपटॉपमध्ये Run होणारे Heavy Application अचानक सुरू होत नसतील, चालत नसतील तर हा व्हायरसचा धोका असू शकतो. तुम्ही लॅपटॉपमध्ये कोणत्याही फाइलचा वापर करत नसाल, तरीही फाइल साइज सतत बदलत असल्यास, हा व्हायरस असल्याचा संकेत ठरू शकतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यास लगेच त्याबाबत तपास करुन योग्य ती अॅक्शन घ्या. अन्यथा लॅपटॉप हॅक होवून तुमची पर्सनल माहिती चोरी होण्याचा धोका निर्माण होतो.