App असली आहे कि नकली कसं ओळखाल? या गोष्टी तपासा, नुकसानापासून होईल बचाव
सध्या अनेक गोष्टींसाठी Apps उपलब्ध आहेत. फिटनेस, भविष्य, मोबाईल ऑप्टिमायजेशन, गेम्स, हेल्थ मॉनिटरिंग, शॉपिंग आणि असे कितीतरी अॅप्स असतात. नुकतेच गुगल प्ले स्टोरवर असे काही अॅप्स आढळले जे फेसबुक लॉगइन आयडी आणि पासवर्ड चोरी करत होते. त्यामुळे बनावट, फेक अॅपपासून सावध राहणं गरजेचं आहे. यासाठी असली आणि नकली यातील फरक समजणं गरजेचं आहे.
|
1/ 6
स्पेलिंग - असली आणि नकली App मध्ये मोठा फरक स्पेलिंगचा असतो. स्पेलिंगमध्ये एखादा शब्द कमी किंवा जास्त वाढवला जातो. स्पेलिंगच्या सुरुवातीला, शेवटी किंवा मध्ये काही बदल केले जातात. त्यामुळे कोणतंही अॅप डाउनलोड करताना हे पाहणं गरजेचं आहे.
2/ 6
रेटिंग आणि डाउनलोड - Apps चे रिव्ह्यू, रेटिंग आणि डाउनलोड तपासावं.
3/ 6
पब्लिश डेट - अॅपच्या पब्लिश डेटवर लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या कंपनीचं नवं अॅप असल्यास त्याची पब्लिश डेटही नवी असणं गरजेचं आहे.
4/ 6
डिस्क्रिप्शन - Apps च्या डिस्क्रिप्शनवर लक्ष द्या. यामुळे अॅपची माहिती मिळेल. तसंच रिव्ह्यूमधूनही अॅपची माहिती घेण्यास मदत होईल.
5/ 6
परमिशन - अॅप तुमच्याकडून कोणत्या परमिशन मागतं हेदेखील तपासावं. जर सर्वसाधारण माहितीहून अधिक माहिती मागितली जात असेल, तर सावध व्हा.
6/ 6
ब्राउजरमध्ये स्टोर वेबसाईट - ब्राउजरमध्ये स्टोरच्या वेबसाईटवर 'गेट अवर अॅप' पर्याय सर्च करू शकता, जो संबंधित अॅपवर घेऊन जाईल आणि ऑथोराईज्ड अॅप डाउनलोड करता येईल.