Instagram वरुन सोप्या पद्धतीने डाउनलोड करा Reels, पाहा काय आहे प्रोसेस
Instagram जगातील सर्वात पॉप्युलर फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग App आहे. युजर्सला आपले फोटो आणि व्हिडीओ क्रिएटिव्हिटीसह शेअर करण्यासाठी यात अनेक फीचर्स दिले जातात. ज्यात IGTV व्हिडीओ, स्टोरीज, लाइव व्हिडीओ आणि Reels सामिल आहेत. Instagram युजरकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्ट सहजपणे सेव्ह करता येतात. पण रील्स सेव्ह करताना अनेकांना अडचणी येतात. परंतु काही सोप्या स्टेप्सने रील्स डाउनलोड करता येतील.
|
1/ 7
रील एक 60 सेकंदाचा व्हिडीओ असून यात ऑडिओ, एआर इफेक्ट्स आणि इतर क्रिएटिव्ह टूल्स आहेत. रील्सला क्लिपप्रमाणे एका सीरिजमध्ये किंवा एकत्रच रेकॉर्ड करू शकता. रील्स इन्स्टाग्रामवर टिकटॉकप्रमाणेच एक फीचर आहे.
2/ 7
रील्स बनवण्यासाठी राइट साइड स्वाइप करा आणि स्क्रिनच्या खाली असलेल्या Reel पर्यायावर टॅप करा. त्यानंतर App मध्ये सर्वात वर असलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि रील्स पर्यायावर टॅप करा.
3/ 7
व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी व्हिडीओ प्लेअर आयकॉनवर क्लिक करा. आता एक सुटेबल स्पीड निवडा आणि रीलमध्ये फोटो, स्टिकर आणि म्यूझिक Add करा.
4/ 7
रील शेअर करण्यासाठी Preview बटणावर क्लिक करा. त्यानंतर शेअर बटणावर क्लिक करा.
5/ 7
आता Reel डाउनलोड करण्यासाठी Reels Downloader App डाउनलोड करा. त्यानंतर फोनमध्ये इन्स्टाग्राम ओपन करा आणि Reels मध्ये जा.
6/ 7
आता जे रील डाउनलोड करायचं आहे, त्या रीलची लिंक कॉपी करा. रील डाउनलोडर App मध्ये रीलची लिंक पेस्ट करा.
7/ 7
डाउनलोड बटणावर टॅप करा. त्यानंतर फोनमध्ये रील डाउनलोड होण्यास सुरू होईल. तुम्ही फोनच्या गॅलरीमध्ये ते अॅक्सेस करू शकाल.