कितीही प्रयत्न केले तरी कुणीच पाहू शकत नाही तुमची Google Search History, करा हे एकच काम
स्मार्टफोन, लॅपटॉप, कंप्युटरवर असताना प्रत्येकजण गुगलवर (Google) काही ना काही सर्च करत असतो. यावेळी अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्या आपल्याला इतरांना कळू द्यायच्या नसतात. आपला फोन, लॅपटॉप, कंप्युटर जर कोणी वापरत असेल, तर नेहमी आपण काय सर्च केलं, हे दुसरा व्यक्तीही पाहू शकतो याची भीती असते. यापासून वाचण्यासाठी तुमच्या लॅपटॉप, कंप्युटरमध्ये काही बदल करावे लागतील.
|
1/ 6
काही सोप्या टिप्सने युजर गुगल सर्च हिस्ट्रीला (Google Search History) पासवर्ड (Password) ठेऊ शकतात. यामुळे कोणी काही बघेल याची भीतीही नसेल आणि तुम्हीही सुरक्षित राहाल.
2/ 6
वेब ब्राउजरवर activity.google.com ओपन करा आणि तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साईन-इन (Sign-in) आहात की नाही ते तपासा.
3/ 6
त्यानंतर Manage My Activity Verification वर क्लिक करा.
4/ 6
यात Require Extra Verification निवडा आणि सेव्हवर क्लिक करा.
5/ 6
इथे व्हेरिफाय करण्यासाठी तुमचा गुगल अकाउंट पासवर्ड (Google Account Password) टाकावा लागेल.
6/ 6
आता तुमची Google Search History पासवर्डने सुरक्षित होईल.