

2020 वर्षाच्या अखेरीस होंडाने त्यांच्या कार्सवर डिस्काउंट आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. BS6 कार्सवर या अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.


होंडा अमेज (Honda Amaze) स्पेशल एडिशन : या कारवर 15000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेल जुन्या गाड्यांच्या एक्सचेंजवर 7000 रुपये कॅश डिस्काउंट आहे.


Honda Amaze च्या एक्सक्लुसिव्ह एडिशनवर 27,000 रुपयांपर्यंत ऑफर आहे. ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल एडिशनवर मिळेल. दोन्ही वेरिएंटवर 12,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 15000 रुपयाचा एक्सचेंज बोनस ऑफर आहे.


Honda Amaze च्या इतर मॉडेल्सवर 37,000 रुपयांची ऑफर आहे. चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी वॉरंटी वाढवण्याची ऑफर आहे. ज्याची किंमत 12000 रुपये आहे. या गाडीवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.


Honda Jazz च्या पेट्रोल वेरिएंटवर 40,000 रुपयांची ऑफर आहे. यात 25,000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस सामिल आहे.