

Google चे बुधवारी जॉब लिस्टिंग अॅप Kormo Jobs भारतात लाँच करण्यात आले. याआधी हे अॅप सर्वात आधी 2018 मध्ये बांग्लादेशात लाँच करण्यात आले होते.


युजर्ससाठी विविध जॉब्सबाबत माहिती देणारे हे अॅप आहे. ज्यामध्ये युजर्स त्यांचा डिजीटल CV देखील बनवू शकतात. कंपनीने त्यांच्या ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


नोकरीच्या विविध संधी शोधण्यासाठी हे अॅप उपयोगी ठरेल. मायक्रोसॉफ्टच्या LinkedIn शी स्पर्धा करणारे हे अॅप ठरणार आहे.


भारतामध्ये आधीच असणाऱ्या Naukari किंवा Timesjobs या वेब पोर्टलशी देखील गुगलच्या या अॅपची स्पर्धा असेल.


या अॅपमध्ये तुम्हाला रेकमंडेड जॉब्स दिसतील, त्याचप्रमाणे नवीन नोकरी शोधता देखील येईल. नवीन नोकरीच्या ठिकाणी अर्ज देखील या अॅपच्या माध्यमातून करता येईल.


या अॅपमध्ये युजर्सना त्यांची कौशल्य, शिक्षण, नोकरीचा अनुभव याबाबत माहिती देऊन प्रोफाइल बनवता येईल.