

गुगल अर्थवर वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेले फोटो असतात. यामध्ये सॅटेलाइट, एरोप्लेन, ड्रोन आणि बलूनमधून घेतलेल्या फोटोंचा समावेशही असतो. या फोटोंमधून जगातील अनेक माहिती नसलेल्या जागांची आणि गूढ ठिकाणांची माहिती समजते.


संशोधकांनी अनेक फोटो एकत्र केले आहेत. ज्यामध्ये जमिनीवर असलेल्या वेगवेगळ्या गूढ आकारांचा समावेश आहे. यामध्ये स्वस्तिकची आकृती दिसत असलेला एक फोटो आहे.


विचित्र प्रकारचे असलेले हे ठसे 8,500 वर्षांपूर्वीच्या जॉर्ड़नमधील आहेत. यात पावलांचे वेगवेगळे ठसे आहेत.


गुगल अर्थवर इजिप्तमधील पिरॅमिडसह इतरही अनेक गूढ फोटो आहेत. त्यातील ठिकाणांची माहिती मात्र समोर आलेली नाही. तसंच फोटोतील दिसणाऱ्या आकृती मानवाने उभारलेल्या वास्तू आहेत की नैसर्गिक रचना हे समजलेलं नाही.


दक्षिण प्रशांत महासागरात एक आयलंड दिसलं होतं. त्याला सँडी आयलंड असंही म्हटलं जातं. नोव्हेंबर 2012 मध्ये संशोधकांनी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पण तिथं फक्त पाणीच आढळलं. टापूचे भूत असंही याला म्हटलं जातं.