फक्त 999 रुपयात खरेदी करा Xiaomi चा 'हा' स्मार्टफोन, 10 हजारापेक्षा जास्त मिळणार सूट
शिओमी कंपनीकडून वर्षाच्या शेवटी दमदार ऑफर देण्यात आली आहे. ज्यामुळे 12 हजारांची सवलत मिळू शकते. मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय योग्य ठरेल.
शिओमी कंपनीच्या प्रसिद्ध स्मार्टफोनपैकी एक Redmi Note 5 Pro हा स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी अगदी योग्य संधी आणली आहे. कारण या फोनवर दमदार ऑफर्स दिल्या जात आहेत.
2/ 6
फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो. Flipkart mobile Bonanza या सेलदरम्यान तुम्ही Redmi Note 5 Pro फोन खरेदी करू शकता. आजपासून सुरू झालेला सेल 29 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
3/ 6
Redmi Note 5 Pro फोनची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनला जर तुम्ही SBIच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी करत असाल तर तुम्हाला फोनवर 10 टक्के सूट मिळू शकते.
4/ 6
4GB रॅम+ 64GB स्टोअरेजचा Redmi Note 5 Pro स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. पण तुम्ही जर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन खरेदी केला तर तुम्हाला फक्त 999 रुपये भरावे लागणार आहेत. आणि 12,000 रुपयांची सवलत मिळणार आहे.
5/ 6
Redmi Note5 Pro हा स्मार्टफोन तुम्ही डेबिट कार्डनेसुद्धा खरेदी करू शकता. मुख्य म्हणजे हा मोबाईल तुम्ही EMIवर विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला 1,168 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल.
6/ 6
Redmi Note5 Pro फोनमध्ये 5.9 इंचचा डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल कॅमेऱ्याचा आहे. या स्मार्टफोनचा रिअर कॅमेरा 12 मेघापिक्सल आणि 5 मेघापिक्लस देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 20 मेघापिक्सलचा आहे.