

आजकाल अनेक लोक हातामध्ये घड्याळाच्या ऐवजी फिटनेस बँड बांधत आहेत. दिवसभरात तुम्ही किती चाललात किंवा किती कॅलरीज बर्न करण्यापासून ते किती झोप घेतली इथपर्यंत सर्व माहिती देणारा फिटनेस बँड सध्या सर्वांचीच आवड बनला आहे. पण या फिटनेस बँडमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.


फिटनेस बँड बनवणाऱ्या कंपन्या तुमचा डेटा सुरक्षित असल्याचं सांगतात. परंतु कोणत्याही कंपनीने आजपर्यंत डेटा सुरक्षित असल्याची गॅरंटी दिली नाही. या फिटनेस बँडमध्ये ज्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सीचा (AI) उपयोग केला जातो त्यामुळे युजरचा डेटा सहजरित्या ट्रान्सफर करून चुकीचा वापर केला जाऊ शकतो असा दावा भारतातील एका रिसर्चरने केला आहे.


युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि बार्कले यांनी एकत्र मिळून हा शोध लावला आहे. यामध्ये मुख्य शोधकर्ता भारतीय इंजिनिअर आहे. अशा स्मार्ट वॉचमध्ये AIचा वापर केला जातो यामुळे युजरचा डेटा स्टोअर केला जातो आणि तो हॅकही केला जाऊ शकतो. असा दावा अनिल अश्विनीने केला आहे.


AIच्या मदतीने युजर्सचा पॅटर्न ओळखता येतो. फेसबुकसारखी सोशल साइटसुद्धा या इंटेलिजन्सीच्या मदतीने हेल्थचा डेटा मिळवून दुसऱ्या कोणाला ट्रान्सफर करता येऊ शकते. त्यामुळे तुमच्या हेल्थचा डेटा सहजरित्या दुसऱ्या कंपनीला विकला जाऊ शकतो.


रिसर्चर्सच्या मते स्मार्ट डिव्हाइसची चूक नाही पण तुमच्या हेल्थचा डेटा ट्रान्सफर होत असेल तर ते तुमच्यासाठी धोक्याचं आहे. कारण हेल्थचा डेटा लिक होण्याबाबत अद्याप कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्याची माहिती लिक झाल्यास तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही.


फिटनेस बँडबाबत युजर्सच्या माहिती सुरक्षेविषयीचे मद्दे याआधीही उचलण्यात आले होते. बिशप फॉक्सचे मुख्य सुरक्षा विश्लेषक कोनन डुलीच्या मते या बँडमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सी अॅडवान्स असते. जी युजरला पूर्णपणे ट्रॅक करते. जर तुमच्या पावलापावलाची माहिती लिक झाली तर फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबासाठीही धोक्याचं असू शकतं.