मेसेंजरचा व्हॅनिश मोड वापरणं खूप सोपं आहे. अपडेट केल्यानंतर, आपण ज्या नॉर्मल मेसेंजर चॅटबॉक्समध्ये आहात तिथून थ्रेड स्वाईप करून आपण व्हॅनिश मोडमध्ये प्रवेश करू शकता. पुन्हा स्वाइप अप केल्यानंतर नॉर्मल मोडमध्ये परत येता येतं. फेसबुक मेसेंजरच्या व्हॅनिश मोडमध्ये केवळ मजकूरच नाही तर जीआयएफ, स्टिकर्स आणि फोटोदेखील डिलीट होऊ शकतात. असंच एक वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध आहे, जे 7 दिवसांनंतर संदेश स्वतःहून हटवतं.