Hyundai च्या या गाड्यांवर मिळेल 100000 रुपयांपर्यंत डिस्काउंट, वाचा काय आहेत ऑफर्स
फेस्टिव्ह सीझनंतर पुन्हा एकदा कार निर्माता कंपन्यांनी त्यांचा स्टॉक संपवण्यासाठी वर्षअखेर गाड्यांवर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. महिंद्रा आणि मारुतीनंतर आता ह्युंदाइने देखील डिस्काउंटची घोषणा केली आहे. Hyundai ने Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra या गाड्यांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.


Hyundai Elantra वर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला 70 हजार रुपयांचे कॅश बेनिफिट आणि 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. Hyundai Elantra ची किंमत 17 लाख 60 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं टॉपचं मॉडेल 20 लाख 65 हजार रुपयांचं आहे.


Hyundai Santro वर 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 30 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 5 हजार रुपयांंचे कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. Hyundai Santro ची किंमत 4 लाख 63 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं टॉपचं मॉडेल 6 लाख 31 हजार रुपयांचं आहे.


Hyundai Grand i10 वर 60 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 40 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांंचे कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.Hyundai Grand i10 ची किंमत 5 लाख 91 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं टॉपचं मॉडेल 5 लाख 99 हजार रुपयांचं आहे.


Hyundai Grand i10 Nios वर 30 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 15 ते 45 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांंचे कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. Hyundai Grand i10 Nios ची किंमत 5 लाख 12 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं टॉपचं मॉडेल 8 लाख 35 हजार रुपयांचं आहे.


Hyundai Aura वर 40 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 20 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांंचे कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. Hyundai Aura ची किंमत 5 लाख 85 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचं टॉपचं मॉडेल 9 लाख 28 हजार रुपयांचं आहे.