थंडीच्या(Winter) दिवसात गाडीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. या काळात थंडी पडल्यानं गाडीवर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या काळात गाडीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या पैश्याची बचत होऊन गाडी देखील सुरक्षित राहील. हिवाळ्यामध्ये गाडीची कशी काळजी घ्यावी यासंबंधी काही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
हिवाळ्याच्या दिवसात आपण कधीकधी गाडी बाहेर काढतो. त्यामुळे गाडी बंद असताना दररोज केवळ गाडी चालू करून बंद केल्यास तुमची बॅटरी (Battery) सुरक्षित राहू शकते. यता काळात अनेकदा बॅटरी खराब होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे सलग गाडी बंद राहिल्यानं बॅटरी डिस्चार्ज होऊन खराब होण्याची देखील शक्यता असते. यामुळं या काळात बॅटरीकडं लक्ष द्यावं.
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात धुकं पडत. गाडी चालवताना रस्त्यावरील पुढील भाग दिसणं अवघड होतं. या काळात गाडीला फॉगलॅम्प(Foglamp) असल्यास रस्त्यावरील दृश्य साफ दिसण्यास मदत होते. पिवळ्या रंगाचे फॉगलॅम्प लावल्यानं तुम्हाला समोरील क्लिअर दिसले. सफेद रांगामुळं धुक्याच्या पार दिसण्यास अडचण होत असल्यानं फॉगलॅम्प या केवळ पिवळ्या रंगाच्या लावाव्या.