598 रुपये जीओ प्लान : 598 रुपयांच्या प्लानमध्ये 2 GB डेटा प्रतिदिन मिळतो. म्हणजे संपूर्ण प्लानमध्ये 112 GB हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यास, याचा स्पीड कमी होऊन 64Kbps होतो. जीओ नेटवर्कमध्ये 200FUP मिनिट बोलण्यासाठी मिळतात. त्याशिवाय रोज 100 SMS मिळतात. जीओच्या या प्लानमध्ये कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय 1 वर्षासाठी disney+ hotstar सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळतं.
599 रुपयांचा प्लान : या प्लानची वैधता 84 दिवस आहे. या प्लानमध्येही 2 GB दररोज मिळतात. 112 GB हायस्पीड डेटा मिळतो, लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 64Kbps होतो. जीओ नेटवर्कमध्ये 200FUP मिनिट बोलण्यासाठी मिळतात. दररोज 100 एसएमएस आणि या प्लानवर कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय disney+ hotstar सब्सक्रिप्शन 1 वर्षासाठी फ्रीमध्ये मिळतं.
प्लानमध्ये काय फरक आहे : 1 रुपयाचं अंतर असणाऱ्या या प्लानमध्ये वैधतेचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लानची वैधता अर्थात व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. तर 599 प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. दोन्ही प्लानमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा फरक आहे. 599 रुपयांच्या प्लानमध्ये, केवळ 1 रुपया अधिक खर्च करून 28 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवता येईल. त्यामुळे कोणताही मोबाईल रिचार्ज करताना, बारकाईने लक्ष देऊन, कोणत्या प्लानमध्ये कोणते आकर्षक प्लान लपले आहेत ते पाहूनच त्याची निवड करा.