

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी कमी दरात जास्त डेटा देण्यासाठी दोन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. हा प्लॅन 96 रुपये आणि 236 रुपयांत मिळत आहे. यामध्ये इतर प्लॅनच्या तुलनेत सर्वाधिक डेटा मिळतो.


96 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची मुदत आणि 236 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची मुदत दिली जात आहे. प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा दिवसाला दिला जाणार आहे. म्हणजेच 96 रुपयांत 280 जीबी डेटा तर 236 रुपयांत 840 जीबी डेटा मिळणार आहे.


ग्राहकांना फक्त डेटा दिला जाणार आहे. मेसेज आणि कॉलिंगसाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल. बीएसएनएलची 4G सेवा सर्वत्र उपलब्ध नाही. बीएसएनएलने हा प्लॅन ज्या ठिकाणी फोरजी सेवा आहे तिथंच सुरू केला आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात ही सेवा उपलब्ध असून तिथं या प्लॅनचा वापर करता येईल.


बीएसएनएलने नुकताच एक वार्षिक प्लॅनही जाहीर केला होता. त्यामध्ये अॅमेझॉन प्राइमचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. हा प्लॅन 399 रुपयांना असून याशिवाय वार्षिक ब्रॉडबँड प्लॅनही दिले जाणार आहेत.


एक वर्षासाठी ग्राहकांना प्राइम सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. एक वर्षाच्या अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत 99 इतकी आहे. यामध्ये प्राइम व्हिडिओ, म्यूझिक, फ्री प्रोडक्ट शिपिंग याशिवाय एक्सक्लूझिव डील्समध्ये सबस्क्रीप्शन असलेल्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जातं.