यंदाचं 2018 वर्ष आता जेमतेम संपत आलं आहे. यादरम्यान सगळ्या स्मार्टफोन कंपन्यांनी दमदार कॅमेरे असलेले स्मार्टफोन लाँच केले आहेत. संपूर्ण वर्षामध्ये जास्त प्रमाणात कंपन्यांचं फोकस स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर राहिला आहे. मोबाईल कंपन्यांनी आपआपल्या फोनचे मेघापिक्सल वाढवत फोनमध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्सी आणि ब्यूटी मोड आणला. आज आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी 2018 वर्षामध्ये फोनच्या कॅमेऱ्यावर आणि फिचर्सवर भर दिला आहे.
Apple iPhones XS : अमेरिकेची स्मार्टफोन बनवणारी प्रतिष्ठित कंपनी अॅपलने नुकताच iPhone XS फोन लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. ज्यात 12 मेघापिक्सल वाईड अँगल दिला आहे. कॅमेऱ्याचं अॅपरचर f/1.8 आहे. आणि फोनमध्ये टेलीफोटो कॅमेरा 12 मेघापिक्सलच आहे. याचं अॅपरचर f/2.4 एवढं आहे. फ्रंट कॅमेरा 7 मेघापिक्सलचा RGB कॅमेरा आहे.याचं अॅपरचर f/2.2 इतकं आहे.
Huawei P20 Pro- चीनच्या हुवावे स्मार्टफोन कंपनीने त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन P20 Pro लाँच केला आहे. फोनच्या किंमतीवर नजर टाकली तर जरा महागच आहे. पण फोनचे फिचर्स मात्र पैसा वसूल आहे. 59,999 रुपये अशी या फोनची किंत आहे. या स्मार्टफोनमध्ये 20MP+40MP+8MP असे तीन रिअर कॅमेरा सेटअप आहेत. तसेच सेल्फीसाठी 24 मेघापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये असलेल्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे यात तुम्ही 4k रेकॉर्डिंग करू शकता.
Samsung Galaxy Note 9 : दक्षिण कोरियाची इलेक्ट्रिक कंपनी सॅमसंगने याचवर्षी त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. सुरुवातीला Galaxy Note-9 या स्मार्टफोनची किंमत 67,900 रुपये एवढी आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. या फोनमधील बॅकचे दोन्ही कॅमेरे 12 मेघापिक्सल आहेत. ज्याच्या एका लेन्सचं अॅपरचर f/1.5 आणि दूसऱ्या लेन्सचं अॅपरचर f/2.4 आहे. त्याचबरोबर फ्रन्ट कॅमेरा 8 मेघापिक्सल असून कॅमेऱ्याचं अॅपरचर f/1.7 एवढं आहे. या फोनच्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यातील बोकेह इफेक्ट आहे.
Google Pixel 3- आत्तापर्यंत माहिती दिलेल्या सर्व फोनमध्ये तुम्हाला ड्युअल रिअर कॅमेऱ्या दिसतील पण Google Pixel 3 स्मार्टफोनमध्ये सिंगल कॅमेरा असूनही हा इतर फोनला स्पर्धा देत आहे. या स्मार्टफोनमध्ये 12.2 मेघापिक्सलचा कॅमेरा आहे. याची खासियत म्हणजे कमी लाईटमध्येही चांगला फोटो क्लिक करू शकतो. या व्यतिरिक्त कॅमेऱ्याने तुम्ही पोट्रेट शॉटने फोटो काढता येईल. कंपनीने फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये दोनचं लेन्स ठेवण्यात आल्या आहेत. जो 8 मेघापिक्सलचा आहे.