आषाढस्य प्रथम दिवसे..! हे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून आषाढ महिन्यातील पहिला दिवस बनवा खास; लाईक, कमेंटचा पडेल पाऊस
Aashadhasya Pratham Divase Whatsapp Status: महाकवी कुलगुरू कालिदासाच्या 'मेघदूत' या विरहकाव्यातील दुसरा श्लोक 'आषाढस्य प्रथम दिवसें' हा आजच्या दिवसासाठी प्रसिद्ध आहे.'आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।' 'आषाढ' म्हटले की, आठवतो ढगांच्या काळ्या पुजक्यां अडून गर्जना करत बसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं 'मेघदूत'. हा दिवशी कवी कालिदासांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. निसर्गाच्या दृष्टीनेही आषाढ महिन्याचं वेगळं महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या व्हाट्सअप स्टेटसला या निमित्ताने सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमच्या मित्रांनाही पाठवू शकता. चला पाहूयात काही सुंदर स्टेटस...
|
1/ 8
आषाढस्य प्रथम दिवसे..! हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आषाढ महिन्यातील पहिला दिवस बनवा खास; लाईक, कमेंटचा पडेल पाऊस
2/ 8
आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने, प्यावा वर्षाऋतू तरी!
3/ 8
मोरपीस देखणे. आवेगात उसळले आणि हिरवाईत मिसळले मृगाचे हुंदडणे !