अमेरिकेत आयफोन एक्सचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका अमेरिकेतील युझरने ट्विट करत याबद्दल माहिती दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिले की. iOS 12.1 हे व्हर्जन फोनमध्ये अपडेट करताना अचानक फोनचा स्फोट झाला.
2/ 6
iOS 12.1 अपडेट करताना फोनमधून धूर निघायला लागला आणि काही कळायच्या आतच फोन फुटला. युझरने सांगितले की, तो कंपनीच्या अडप्टरने आणि लाइटिंग केबलनेच फोन चार्ज करत होता. पण तरीही हा स्फोट झाला.
3/ 6
स्फोटानंतर तुटलेल्या फोनचे फोटो युझरने ट्विटरवर शेअर केले आहेत. वॉशिंगटनच्या फेडरल येथे राहणाऱ्या रहेल मोहम्मद नावाच्या एका युजरने १० महिन्यांपूर्वी हा फोन विकत घेतला होता. ट्विटरवर याबद्दलची माहिती मिळाल्यावर अॅपल कंपनीने यासंदर्भात चौकशी करण्यात येतील असे आश्वासन दिले.
4/ 6
रहेलने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कंपनीने iphone x फोन कंपनीत पुढील चौकशीसाठी मागितला आहे. रहेलच्या ट्विटला उत्तर देताना अॅपलने लिहिले की, असं काही होणं नक्कीच अपेक्षित नाहीये. लवकरात लवकर यावर उपाय काढू.
5/ 6
आयफोनचा स्फोट होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना आयफोन आणि अँडरॉईड फोनच्या घडल्या आहेत.
6/ 6
काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ आणि शिओमीचे फोन चार्जिंगवेळी फुटले होते. अॅपलने iphone x हा फोन कंपनीच्या १० व्या वर्धापनदिना दिवशी लॉन्च केला होता. या मोबाईलची किंमत तब्बल ८८,९६६ रुपये आहे.