Apple ने मंगळवारी आयफोन 11 सिरीज लाँच केली आहे. यात iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लाँच करण्यात आले. आयफोनच्या किंमती सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं अनेकदा याच्या खरेदीवरून अनेक मिम्स व्हायरल होतात. अॅपलची खरेदी करण्यासाठी आता किडनीचा पर्यायही कंपनीनं दिला आहे असं काही युजर्सनी म्हटलं आहे. सेक्रेड गेममधील एका डायलॉगचा वापर करत आयफोनसाठी किडनीचं बलिदान द्यावं लागेल असं एक मीम शेअर केलं जात आहे. अमेरिकेत iPhone 11 699 डॉलर आहे तर भारतात हिच किंमत 64 हजार रुपयांपर्यंत असेल. iPhone Pro भारतात सुरुवातीला 99,900 रुपयांपर्यंत मिळेल. तर iPhone 11 Pro Max जवळपास 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असेल. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे दोन्ही फोन 256GB आणि 512GB जीबी स्टोरेजमध्ये मिळतील. अॅपलचे नव्या सिरीजचे फोन 27 सप्टेंबरपासून भारतात उपलब्ध होतील.