नवीन फोन (New Smartphone) घेतल्यानंतर सर्वच जण त्याची अगदी मनापासून जपणूक करतात. खराब हात लागू नयेत, स्क्रिनवर स्क्रॅच येऊ नये, मोबाईल कव्हर अशा अनेक गोष्टी लगेच केल्या जातात. आजकाल स्मार्टफोन दररोजच्या वापरातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फोनमध्ये जराशी जरी गडबड झाली, काही खराब झालं, तरी मोठी समस्या येते. त्यामुळे फोन घेतल्यानंतर काही टिप्स फॉलो करणं फायद्याचं ठरेल, मोबाईल सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.