

मोबाइल वापरत नाही, अशी व्यक्ती आज शोधावी लागेल. आज मोबाइलची गरज आणि व्यसन या दोन्ही गोष्टी माणसांमध्ये पाहायला मिळतात.


तर आजच्या दिवशी 25 वर्षांपूर्वी भारताच्या टेलिकॉम इंडस्ट्रीचा इतिहास बदलणारा फोन कॉल करण्यात आला.


31 जुलै 1995 साली हा पहिला फोन कॉल करण्यात आला. भारतातीकल दूरसंचार आणि कम्यूनिकेशन क्षेत्राला कलाटणी देणारा तो पहिला फोन कॉल होता.


तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बासू यांनी 31 जुलै 1995 रोजी पहिल्या फोन कॉल द्वारे भारतातील पहिले-वहिले मोबाइल संभाषण केले.


कलकत्ता (आताचे कोलकाता) याठिकाणच्या राइटर्स इमारतीमधून थेट नवी दिल्लीतील संचार भवनमध्ये Modi Telstraच्या मोबाइल नेट सर्व्हिसच्या माध्यमातून हा फोन कॉल करण्यात आला होता. मोबाइल नेट सर्व्हिसची कोलकातामध्ये त्यावेळी सुरुवात झाली