

सामान्यपणे सकाळ आणि संध्याकाळ अशी चहा पिण्याची वेळ असते. मात्र सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा आवडीमुळे अनेकांच्या चहा पिण्याची सवय आणि वेळ बदललेल्या आहेत. हेल्थ डायझेटच्या मते, याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकता


अनेकांना जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. तुम्ही खाल्लेल्या पदार्थांमधील आवश्यक पोषक घटक तुमच्या शरीराला मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते जेवणानंतर किमान तासभर तरी चहा पिऊ नये.


जेवणाआधी देखील तासभर चहा पिऊ नये. जेवणाआधी चहा प्यालल्यानं भूक मरते आणि आपण जेवत नाही त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.


चहामुळे तुम्ही खात असलेल्या खाद्यपदार्थांवरच नाही तर औषधांवरही परिणाम होतो. चहा प्यायल्यानं औषधांमधील घटकाचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे औषधं ही पाणी किंवा दुधासोबतच घेणं योग्य आहे.


अनेकांना गरमागरम चहा प्यायला आवडतो, मात्र त्याचे दुष्परिणामही होतात. गरम चहामुळे जीभ आणि घसा तर भाजतोच मात्र तज्ज्ञांच्या मते, चहा किंवा कोणतंही पेय गरम प्यायल्यानं तोंड, घसा, पोट, अन्ननलिका यांचे कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते.