इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने पराभव झाला. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समन आणि बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) जॉस बटलरची विकेट घेतली, पण तोही महागडा ठरला. चहलने 4 ओव्हरमध्ये 44 रन दिले. पण भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम चहलने केला आहे.