

भारतीय संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंग यानं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 19 वर्ष तब्बल युवराजनं क्रिकेटची सेवा केली, त्यानंतर सोमवारी त्यानं निवृत्ती घेतली. मात्र चाहत्यांमध्ये युवराजला शेवटचा सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही याची खंत आहे. मात्र युवराज एकमेव असा खेळाडू नाही आहे. पाच दिग्गज खेळाडूंना असेच अपमानित होऊन निवृत्ती घ्यावी लागली होती.


भारतीय संघाचा सर्वात शानदार जलद गोलंदाज जहीर खान यानं 15 ऑक्टोबर 2015मध्ये ट्विटरच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केली. जहीरनं देशासाठी 200 सामन्यात 282 विकेट घेतल्या आहेत. मात्र त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निवृत्ती घ्यायची वेळ आली होती.


भारताचा स्पेशल फलंदाज व्हि. व्हि. एस. लक्ष्मण याला भारताचा कणा म्हटले जायचे. मात्र त्यालाही अपमानीत होऊन निवृत्ती घ्यावी लागली. 2002मध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठी लक्ष्मणला संघात सामिल करण्यात आले होते, मात्र त्यांनं खेळण्यास नकार दिला. लक्ष्मणनं 86 एकदिवसीय सामन्यात 2338 धावा केल्या. तर, 134 कसोटी सामन्यात 8781 धावा केल्या. मात्र त्याला शेवटचा सामना खेळता आला नाही.


स्फोटक सलामी फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं आपल्या 37व्या वाढदिवसादिवशीच निवृत्ती घेतली. 2011च्या विश्वचषकात आपल्या प्रत्येक सामन्याची सुरुवात चौकारानं करणाऱ्या सहवागनं जहीर खाननं निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच क्रिकेटमधून संन्यास घेतला. सहवागनं 251 सामन्यात 8273 धावा केल्या आहेत.


2011च्या विश्वचषकात 97 धावांची खेळी करणाऱ्या गंभीरला मात्र मैदानाबाहेर निरोप घ्यावा लागला. गंभीरनं 4 नोव्हेंबर 2018मध्ये आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्ती घेतली. गंभीरनं 147 एकदिवसीय सामन्यात 5238 धावा केल्या आहेत.


भारताचा संयमी फलंदाज आणि द वॉल या नावाने जगप्रसिध्द असलेल्या राहुल द्रविडला मैदानाबाहेर निवृत्ती घ्यावी लागेल, असे कोणलाही वाटले नव्हते. मात्र, द्रविडच्या नशीबीही मैदानाबाहेरची निवृत्ती आली. द्रविडनं देशासाठी एकूण 344 एकदिवसीय सामने खेळले आहेत, यात त्यानं 10889 धावा केल्या आहेत. तसेच त्यानं 164 कसोटी सामने खेळले आहेत. यात 13288 धावा केल्या आहेत.