यश दयालचे वडील चंद्रपाल दयालही क्रिकेटर होते. त्यांनी उत्तर प्रदेशकडून विझी ट्रॉफीममध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. पण क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी यशवर कधीही दबाव टाकला नाही. पण तो एक चांगला क्रिकेटर व्हावा हे चंद्रपाल यांचं स्वप्न होतं. अखेर यशला इंडियासाठी पहिला कॉल आला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.