क्रिकेटमध्ये पुरुष क्रिकेटर्ससोबत महिला क्रिकेटरसुद्धा मोठी कमाई करतात. महिला प्रीमियर लीगमध्ये महिला क्रिकेटर्सच्या कमाईत मोठी वाढ झालीय. ऑस्ट्रेलियाची अनुभवी क्रिकेट एलिस पेरी जगातील सुंदर महिला क्रिकेटर्सपैकी एक आहे. तसंच सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरसुद्धा आहे. पेरीची एकूण संपत्ती १४ मिलियन म्हणजेच जवळपास ११५ कोटी रुपये इतकी आहे.
एलिस पेरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसं बोलत नाही. मात्र तिच्या चाहत्यांना याबाबत उत्सुकता असते. आता पुन्हा एकदा एलिस पेरी रिलेशनशिपमध्ये अशल्याचं म्हटलं जातंय. २०२० मध्ये ती पती रग्बीपटू मॅट टुमुआपासून विभक्त झाली होती. एलिस आणि मॅट यांनी डिसेंबर २०१५ मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या घटस्फोटाचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.