वर्ल्ड कपच्या मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत. हे सामने 2 तास आधी 11.30 वाजता सुरू करण्यात यावेत, अशी मागणी अश्विनने आयसीसीकडे केली आहे. मॅच 11.30 वाजता सुरू झाल्या तर मॅचवर धुक्याचा प्रभाव कमी पडेल, असं अश्विनला वाटतं. घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकण्याची प्रमुख दावेदार आहे, असं अश्विन म्हणाला.