ऑस्ट्रेलियन खेळाडू सामन्यावेळी प्रेक्षकावर थुकला; आता 8 लाख दंड भरावा लागणार
Wimbledon 2022 : ऑस्ट्रेलियन खेळाडू निक किर्गिओसला विम्बल्डन टेनिस ग्रँड स्लॅममधील पहिल्या फेरीतील विजयादरम्यान गैरवर्तन केल्यामुळे मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाच्या नियमांच्या विरुद्ध वागल्याने त्याला US$10,000 (अंदाजे रु. 8 लाख) दंड ठोठावण्यात आला. या स्पर्धेतील आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे. किर्गिओसने प्रेक्षकांवर थुंकण्याचे गैरवर्तन केलं.
|
1/ 5
किर्गिओसने पहिल्या फेरीच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कबूल केले की, तो त्रास देणाऱ्या एका प्रेक्षकावर थुंकला होता.
2/ 5
गुरुवारी ऑल इंग्लंड क्लबने सामन्यादरम्यान आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम जाहीर केली.
3/ 5
इतर सात खेळाडूंना खेळाच्या नियमांविरोधात किंवा अश्लील शब्द वापरल्याबद्दल प्रत्येकी तीन हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.
4/ 5
त्याच्याशिवाय इतर एकूण पाच महिला खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे.
5/ 5
यामध्ये सर्वात जास्त दंड रॅकेट तसेच इतर उपकरणे फोडल्याबद्दल डारिया सॅव्हिलला $4,000 चा दंड ठोठावण्यात आला.