सिमरन खोसलाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये तिचा व्यवसाय फिटनेस आणि स्पोर्ट्स न्युट्रीशनिस्ट असा लिहिला आहे. तसंच ती लाईफस्टाईल कोचही आहे. याशिवाय तिने वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्येही भाग घेतला आहे. 2019 साली सिमरनला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. याचा उल्लेख तिने बायोमध्ये केला आहे. (Photo- buttlikeanapricot)
सिमरन खोसलाचा पती उन्मुक्त चंदने काहीच महिन्यांपूर्वी वयाच्या 28 व्या वर्षीच भारतीय क्रिकेटला अलविदा केलं. तो आता अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळत आहे. निवृत्तीनंतर उन्मुक्त चंद भारत सोडून अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी गेला. अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये तो सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्ससोबत खेळत आहे. (Photo- buttlikeanapricot)