मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची मुख्य प्रशिक्षक शार्लट एडवर्डस् आहे कोण?
शार्लटने तिच्या नेतृत्वाखाली संघाला दोनवेळा वर्ल्ड कप जिंकून दिला असून वनडे, कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटर्समध्ये ती दुसऱ्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्ये त्यांच्या फ्रँचाइजीच्या मुख्य प्रशिक्षकपदी शार्लट एडवर्डसची नियुक्ती केलीय.
2/ 6
इंग्लंडच्या महिला संघाची माजी कर्णधार असलेल्या शार्लटने संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत.
3/ 6
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटर्समध्ये शार्लट एडवर्ड्स दुसऱ्या स्थानी आहे. तिने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.
4/ 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शार्लटने इंग्लंड, ऑस्ट्रेलियात अनेक संघांसोबत प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.
5/ 6
आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्येही शार्लटचा समावेश असून तिची क्रिकेट कारकिर्द जवळपास दोन दशकांची होती.
6/ 6
गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून शार्लट काम करत असून तिचा अनुभव मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शार्लटच्या नावे इंग्लंडमध्ये घरेलू टी२० स्पर्धाही घेतली जाते.