बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील दबंग नेत्यांपैकी एक आहेत. गोंडा मतदारसंघातून भाजपचे खासदार असलेले बृजभूषण सिंह हे याआधीही अनेकदा वादात अडकले होते.
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक मेडलिस्ट आणि देशातील दिग्गज कुस्तीपट्टूंनी गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगाट हिने आरोप करताना म्हटलंय की, अनेक महिला पैलवानांचं लैंगिक शोषण करण्यात आले आहे.
2/ 6
बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील दबंग नेत्यांपैकी एक आहेत. गोंडा मतदारसंघातून खासदार असलेले बृजभूषण सिंह हे याआधीही अनेकदा वादात अडकले होते.
3/ 6
कुस्तीला देशात चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. तर काही लोकांनी असंही म्हटलंय की, ते स्वत:च्या खिशातून कुस्तीसाठी पैसे खर्च करतात.
4/ 6
बृजभूषण सिंह याआधी पैलवानाला सर्वांसमोर कानशिलात लगावल्याने वादात अडकले होते. तर बाबरी विध्वंस प्रकरणातही त्यांचे नाव आले होते. तसंच टीव्ही शोमध्ये त्यांनी खून केल्याचंही कबूल केलं होतं.
5/ 6
बृजभूषण सिंह हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. राजेशाही थाटात राहणाऱ्या बृजभूषण यांच्याकडे हेलिकॉप्टर, महागड्या गाड्या आणि घोडेही आहेत.
6/ 6
आतापर्यंत इतके वाद होऊनही बृजभूषण त्यात अडकले नाहीत. मात्र यावेळी थेट ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनीच बृजभूषण सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.