

भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यानंतर ऋषभ पंतला वगळल्याने अनेकांनी निवड समितीवर ताशेरे ओढले. संघात कोणाला स्थान द्यायला हवे होते? कोण नको याबद्दल दिग्गज आणि माजी खेळाडूंनी सल्ले दिले आहेत.


ज्या निवड समितीने 15 जणांचा संघ निवडला त्यांच्यापैकी कुणीही वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्यावरूनही बीसीसीआयच्या निवड समितीवर पुन्हा टीका होत आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड़ समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्याशिवाय देवांग गांधी आणि जतीन परांजपे यांनी 4 सामने खेळले आहेत.


शरणदीप सिंग यांनी 3 तर गगन खोडा यांनी 2 एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यातील खोडा आणि परांजपे यांनी तर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे अशा लोकांचा समावेश असलेली समितीने केलेली निवड योग्य असेल का? असाही प्रश्न विचारला जात आहे