Ind vs Ban: टीम इंडियाच्या विजयाचं क्रेडिट कुणाला? 'हा' आहे भारत बांगलादेश सामन्यातला टर्निंग पॉईंट
Ind vs Ban: टीम इंडियानं बांगलादेशला हरवून ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे भारताचं सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. पण भारतानं बांगलादेशविरुद्धची ही मॅच अवघ्या 5 धावांनी जिंकली. पण या मॅचमधला टर्निंग पॉईंट कोणता ठरला? पाहूयात...
टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात टीम इंडियानं पुन्हा एकदा एक सनसनाटी विजय साजरा केला. बांगलादेशचा 5 विकेट्सनी पराभव करुन भारतीय संघानं सेमी फायनलचं तिकीट जवळपास कन्फर्म केलं आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियानं डकवर्थ लुईस नियमानुसार बाजी मारली.
2/ 8
पण टीम इंडियाच्या या विजयाचं क्रेडिट कुणाला द्यावं? सांघिक कामगिरीमुळे भारतीय संघानं आज सामना जिंकला हे खरंय पण ही महत्वाची मॅच टीम इंडियाच्या पारड्यात पडली तो टर्निंग पॉईंट कोणता होता?
3/ 8
विराट कोहलीचा सुपर फॉर्म अॅडलेडमध्येही कायम राहिला. हे ग्राऊंड विराटसाठी पुन्हा लकी ठरलं. त्यानं 64 धावांची मोलाची खेळी केली. आणि भारताला एक मोठी धावसंख्या उभारुन दिली.
4/ 8
185 धावांचं टार्गेट बांगलादेशला मिळालं. पण त्यानंतर बांगलादेशनं वेगवान सुरुवात केली. लिटन दासच्या अर्धशतकामुळे 7 ओव्हरमध्ये बांगलादेशनं 66 धावा ठोकल्या. पण त्यानंतर पाऊस आला आणि समीकरण बदललं. पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशला 9 ओव्हर्स 85 धावा हे टार्गेट मिळालं.
5/ 8
पावसाच्या व्यत्ययानंतर मात्र मॅच टीम इंडियाकडे झुकली. कारण भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांवर वर्चस्व गाजववायला सुरुवात केली. अर्शदीप, शमी आणि हार्दिक पंड्या खास प्रभावी ठरले.
6/ 8
बदललेल्या समीकरणानंतर रोहित शर्मानंही आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर केला. शेवटची ओव्हर अर्शदीपसाठी राखून ठेवली. आणि शमी, भुवनेश्वर आणि हार्दिकला योग्य पद्धतीनं वापरलं.
7/ 8
पण या मॅचचा खरा टर्निंग पॉईंट होता तो लिटन दासची ही विकेट. टीम इंडियाला आठव्या ओव्हरमध्ये धोकादायक ठरु शकणाऱ्या दासला रन आऊट केलं. राहुलच्या थेट थ्रोवर तो रन आऊट झाला. आणि त्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली.
8/ 8
राहुलनं या मॅचमध्ये 50 धावा आणि एक महत्वाचा रन आऊट अशी दमदार कामगिरी बजावली. त्यानं केलेला रन आऊट हाच या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरावा.