

वेस्ट इंडिजचा आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा स्टार फलंदाज निकोलस पूरननं (Nicholas Pooran) मंगळवारी साखरपुडा झाल्याची घोषणा केली. पूरन त्याची गर्लफ्रेंड कॅथरीन मिगुलसोबत (Kathrina Miguel) गेली कित्येक वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. (Nicholas Pooran/Instagram)


पूरननं आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचा फोटो पोस्ट केला. पूरननं गुडघ्यावर रोमॅंटिक अंदाजात गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. (Nicholas Pooran/Instagram)


निकोलसनं कॅथरीनसोबतचे फोटो शेअर करत, देवानं मला एक महान आशीर्वाद दिला आहे. मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की मी आणि कॅथरीन मिगुलनं साखरपुडा केला आहे. लव्ह यू मिग्ज...तू मला मिळालीस. (Nicholas Pooran/Instagram)


निकोलसनंतर कॅथरीननेही फोटो पोस्ट केले. तिनं, "तुझ्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले आहे. तुझं माझ्यावर प्रेम करणं हाच एक मोठा आशीर्वाद आहे, ज्यासाठी कायम मी देवाचे आभार मानते. लव्ह यू निकोलस पूरन. (Kathrina Miguel/Instagram)


निकोलस आणि कॅथरीन नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत एकत्र होते. प्रत्येक सामन्यात निकोलसचा सपोर्ट करण्यासाठी कॅथरीन मैदानात होती. निकोलसनं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना संघासाठी जबरदस्त कामगिरी केली.