'या दोन अनमोल संपत्ती', ऑस्ट्रेलियातून परतलेल्या सुंदरने शेयर केला फोटो
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारताच्या विजयात (India vs Australia) मोलाची भूमिका बजावणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) सोशल मीडियावर त्याच्या दोन अनमोल संपत्तीबाबत खुलासा केला आहे.


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने सोशल मीडियावर त्याच्या दोन अनमोल संपत्तीबाबत खुलासा केला आहे. वॉशिंग्टन सुंदरने त्याचे वडिल आणि पहिल्या टेस्टसाठी मिळालेल्या टीम इंडियाच्या टोपीचा फोटो शेयर केला आहे. (Sunder/Instagram)


सुंदरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या मॅचमधून टेस्टमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा सुंदर 301 वा भारतीय क्रिकेटपटू बनला होता. (Sunder/Instagram)


वॉशिंग्टन सुंदरने एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये तो वडिलांसोबत उभा आहे आणि त्याचे वडील 301 नंबरची टेस्ट कॅप दाखवताना दिसत आहेत.


हा फोटो शेयर करताना सुंदरने अनमोल संपत्ती असं कॅप्शन दिलं आहे. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये सुंदरने 62 आणि 22 रनची खेळी केली. याचसोबत त्याने मॅचमध्ये एकूण 4 विकेटही घेतल्या. (Sunder/Instagram)


भारतीय टीमने गाबाच्या मैदानात इतिहास घडवला होता. 32 वर्षानंतर एखाद्या टीमने ऑस्ट्रेलियाला या मैदानात हरवलं होतं. (Photo-AP)