IND vs AUS: वीरेंद्र सेहवागला ब्रिस्बेन कसोटी खेळण्याची इच्छा, BCCI समोर ठेवला प्रस्ताव
वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) भारतीय क्रिकेट संघाला (team india) विचारलं की, भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला तातडीनं जाण्याची माझी तयारी आहे. क्वारंटाइनचं (Quarntine) बघुन घेता येईल.


नवी दिल्ली, 12 जानेवारी: सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. 15 जानेवारी रोजी भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये यजमान संघाविरूद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. परंतु सध्या टीम इंडियाला जखमी खेळाडूंची समस्या भेडसावत आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू एकापाठोपाठ दुखापतग्रस्त होत आहेत. (फोटो सौजन्य : वीरेंद्र सेहवाग इंस्टाग्राम)


भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी आता लांबतच चालली आहे. आतापर्यंत भारताचे 9 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. (फोटो सौजन्य: बीसीसीआई/ एपी)


रविचंद्रन अश्विन, मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांनाही दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाची झालेली ही दुर्दैवी अवस्था पाहता माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने चिमटा काढला आहे. (फोटो सौजन्य: एपी)