

आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग सहावा पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेट राखून सामना जिंकला. यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, आम्ही पुन्हा एकदा संधीचा फायदा घेऊ शकलो नाही.


दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर कसिगो रबाडाने 4 फलंदाजांना बाद केल्याने विराट सेनेला 148 धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 67 धावांची खेळी केली.


पराभवाबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर 160 धावांचे आव्हान पुरेसं असेल असं आम्हाला वाटलं होतं पण ठराविक अंतराने आमच्या विकेट पडत गेल्या. मात्र, आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर एका फलंदाजाने टिकून राहणे गरजेचे होते. तसेच 150 धावाही प्रतिस्पर्धी संघाला जास्त होतील असं वाटलं होतं. आमच्या गोलंदाजांनी या धावांचं रक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.


यंदाच्या हंगामात आम्ही मोक्याच्या क्षणी चुका केल्याची कबुली विराटने दिली. तो म्हणाला की, एबी बाद झाल्यानंतर मैदानात उभा राहण्याची गरज होती. या सामन्यात आणखी 25-30 धावा केल्या असत्या तर विजय मिळवता आला असता.