कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने सांगितली, असं विराट म्हणाला होता. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा खोडून काढला.
अनिल कुंबळे आणि विराट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. 2016 मध्ये अनिल कुंबळे टीम इंडियाचे कोच होते मात्र, त्यांना अल्पावधीतच पायउतार व्हावे लागले. आपण कोचपदी कायम राहू नये, अशी विराटची इच्छा असल्याचे संकेत कुंबळेने राजीनामा देताना दिले होते. अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीची (Ravi Shastri) त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.