लग्नाचा तिसरा वाढदिवस, विराटचा अनुष्कासाठी 'खास' मेसेज
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या लग्नाचा आज म्हणजे 11 डिसेंबरला तिसरा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशी विराटने सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मासाठी खास मेसेज लिहिला आहे.


भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज म्हणजे 11 डिसेंबरला तिसरा वाढदिवस आहे. विराट आणि अनुष्का यांनी 11 डिसेंबर 2017 साली इटलीमध्ये लग्न केलं होतं. (Virat Kohli/Twitter)


लग्नाच्या वाढदिवशी विराटने सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मासाठी खास मेसेज लिहिला आहे. 'तीन वर्ष आणि आयुष्यभर एकत्रच राहणार,' असं विराटने त्याच्या पोस्टमध्ये म्हणलं आहे. (Virat Kohli/Twitter)


अनुष्का शर्मानेही विराट कोहलीसोबतचा तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 'तीन वर्ष झाली, आता लवकरच आपण दोघांचे तीन होऊ, मिस यू', असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे. (Anushka Sharma/Instagram)


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी याचवर्षी सोशल मीडियावर आपण आई-वडील होणार असल्याचं जाहीर केलं होतं. जानेवारी 2021 मध्ये घरात नवीन पाहुणा येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. (Virat Kohli/Instagram)


भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. 17 डिसेंबरला ऍडलेडमधली टेस्ट खेळून विराट भारतात परतणार आहे. बीसीसीआयने विराटने मागितलेली पितृत्वासाठीची रजा मंजूर केली आहे. (Virat Kohli/Instagram)


बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी 2017 साली लग्न केलं. अनुष्काला भेटल्यानंतर माझ्या व्यक्तीमत्वात बदल झाल्याचं विराटने अनेकवेळा सांगितलं आहे. (Virat Kohli/Instagram)