PHOTOS: विराट कोहलीच्या लक्झरी गाड्यांचं कलेक्शन पाहून व्हाल थक्क
इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (virat kohli) याला लक्जरीअस गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक लक्जरीअस गाड्या असून आज आम्ही तुम्हाला त्याचा गाड्यांचा संग्रह दाखवणार आहोत. विराटची आवड आणि रसिकता तुम्हाला लक्षात येईल.


विराट कोहलीकडे ऑडी RS5 गाडी असून या फोटोमध्ये तो आपल्याला या गाडीसोबत दिसून येत आहे. (Twitter)


विराट कोहलीने (virat kohli) त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा Thr R8 V10 Plus ही लक्जरी गाडी खरेदी केली होती. 2016 मध्ये त्याने ही गाडी विकली. सध्या त्याची गाडी पोलीस स्टेशनमधे धूळ खात पडली आहे. त्याने ज्या व्याक्तीला ही गाडी विकली होती त्याचे नाव एका घोटाळ्यात आल्यानंतर त्याच्याकडून ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. (Instagram/Virat Kohli)


विराट कोहली या फोटोमध्ये आपल्या ऑडी Q7 या गाडीबरोबर दिसून येत आहे. 2017 मधलं ह TDI डिझेल इंजिन 3 लिटर मॉडेल आहे. पांढऱ्या रंगाच्या या गाडीसोबत विराट कोहली पोज देताना दिसून येत आहे.


विराट कोहलीने 2015 मधील Lamborghini Gallardo LP 560-4 Spyder ही गाडी खरेदी केली होती. संपूर्ण काळ्या रंगाची ही गाडी अतिशय सुंदर दिसून येत होती. ही गाडी 5.2 आणि V10 पेट्रोल इंजिनसह बाजारात आणली होती. या गाडीचा वेग देखील अतिशय जास्त असून प्रतितास 325 किलोमीटर वेगाने ती धावू शकते. कोहलीने 2015 मध्ये खरेदी केल्यानंतर 2017 मधी ती विकली आहे.(Instagram/Virat Kohli)


विराट कोहलीकडे पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर वोग (Range rover vogue) देखील आहे. या गाडीला देखील मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. ही गाडी 4.4 लिटरच्या V8 डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. यामध्ये गाडी 335 Bhp ताकद तयार करत असून 740 Nm टॉर्क पॉवर देखील आहे. (Instagram/Virat Kohli)


इंडियन टीमने सिरीज जिंकल्यानंतर बक्षीस स्वरूपात मिळवलेल्या डस्टर गाडीसह विराट कोहली. या फोटोमध्ये विराट गाडीवर बसलेला दिसत असून त्याच्याबरोबर इंडियन टीममधील इतर प्लेअर देखील आहेत. (Twitter)


विराट कोहलीकडे महागडी बेंटले(Bentley) गाडी देखील आहे. या फोटोमध्ये तो आपल्या या गाडीतून उतरताना दिसून येत आहे. यामध्ये त्याचे मदतनीस देखील आपल्याला दिसून येत आहेत.(Twitter)


ऑडीच्या (Audi) अनेक मॉडेल्सचा विराट चाहता असल्याने बाजारात गाडी आल्यानंतर तो लगेच खरेदी करतो. या फोटोमध्ये देखील नवीन ऑडी A8 घेतल्यानंतर तिचे अनावरण करताना विराट कोहली. (Twitter)


ऑडी S5 या गाडीसोबत पोज देताना विराट कोहली. लाल रंगाच्या या गाडीसोबत विराट कोहली खूपच हँडसम दिसतोय. (Twitter)


ऑडी गाड्यांचा मोठा चाहता असल्यानं जानेवारी 2020 मध्ये भारतात लाँच झालेली ऑडी Q8 कार खरेदी करणारा विराट कोहली पहिला ग्राहक ठरला होता. या गाडीची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये असून यामध्ये 3 लिटरचे TFSI पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. एका शानदार कार्यक्रमात लाँचवेळी गाडीसोबत विराट कोहली दिसून येत आहे. (PTI)