इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतले २३ वे शतकझळकावले. या एका शतकासह विराटने पाच नवे रेकॉर्ड बनवले आहेत.
2/ 6
कसोटीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
3/ 6
या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिवन स्मिथला विराटने मागे टाकले. सध्या स्मिथला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.
4/ 6
परदेशात कर्णधार पदाची धुरा सांभाळत शतक ठोकणाऱ्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे.
5/ 6
तसेच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत विराटने ४४० धावसंख्या करुन भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला मागे टाकले आहे. १९९० मध्ये अजहरुद्दीनने ४२६ धावा केल्या होत्या.
6/ 6
कसोटीमध्ये २३ वे शतक झळकावून विराटने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे.