Home » photogallery » sport » VIRAT KOHLI 2022 IPL PERFORMANCE RECORDS INDIAN PREMIER LEAGUE MHDO

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या किंग Kohli चे 101 सामन्यांमध्ये एकही शतक नाही; अपयशाची काय आहेत कारण?

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लागोपाठ 2 वेळा गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात विराट कोहलीपुढे (Virat Kohli) तिसऱ्यांदा पहिल्या बॉलवर आऊट न होण्याचं आव्हान होतं. हे आव्हान विराटने यशस्वीरित्या पार पाडलं, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात पुन्हा अपयश आलं. खरंतर या सामन्यात विराटला नशिबानेही पाच वेळा साथ दिली, पण या संधींचं त्याला सोनं करता आलं नाही. त्याच्या या अपयशी खेळीनंतर क्रिकेट जगतातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

  • |