शिमला, 26 जून : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी सध्या कुटुंबासोबत शिमलामध्ये सुट्टी साजरी करत आहे. तो सध्या एका सुंदर कॉटेजमध्ये उतरला आहे. या सुट्टीच्या दरम्यान धोनी एका फोटोमुळे ट्रोल झाला आहे.
2/ 5
धोनीनं एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं सर्वांना झाडं लावा आणि जंगल वाढवा, असा संदेश दिला आहे. धोनीनं हा संदेश लाकडाच्या फळीवर लिहलेला आहे. त्यामुळे तो ट्रोल होत आहे. (फोटो: Chennai Super Kings Instagram)
3/ 5
हा संदेश लाकडावर का लिहला आहे? तुम्ही लाकडाचं घर का बांधत आहात? असा प्रश्न ट्रोलर्सनं धोनीला विचारला आहे.
4/ 5
या फोटोचं सत्य वेगळं आहे. धोनीनं कचऱ्यामध्ये फेकलेल्या लाकडावर हा संदेश लिहिला आहे. मीनाबाग होम्सनं हा फोटो शेअर करत याबाबतचं स्पष्टीकरण दिले आहे. मिलमधील जे लाकूड कचऱ्यात फेकण्यात येते त्याचा वापर धोनीनं संदेश देण्यासाठी केला आहे.
5/ 5
हिमाचल प्रदेशात या लाकडांचा वापर हा सामान्यपणे थंडीमध्ये जळण म्हणून केला जातो. धोनीनं याचा सुंदर उपयोग केल्याचं त्यांनी सांगितले आहे.