दारुचं व्यसन, लग्नाआधी गर्लफ्रेंड प्रेग्नंट, पहिलं लग्न मोडलं; वादामुळे क्रिकेट करिअर संपलं
लहान वयातच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द मात्र लहान ठरली. व्यसन आणि वाईट सवयींमुळे त्याच्या कारकिर्दीला गालबोट लागलं.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी अनेकदा वादात अडकला आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. यावेळी त्याची पत्नी एंड्रिया हेविटने आरोप करताना दारुच्या नशेत मारहाण केल्याचं म्हटलं आहे.
2/ 6
काही महिन्यांपूर्वीही विनोद कांबळीने एका मुलाखतीत ओढावलेल्या आर्थिक संकटाबद्दल सांगताना काम देण्यासाठी विनंती केली होती. घर चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचं म्हटलं होतं. प्रशिक्षणाचं काम मिळाल्यास करण्याची तयारी त्याने दर्शवली होती.
3/ 6
व्यसनामुळे आपण आयुष्य उद्ध्वस्त केल्याचंही विनोद कांबळीने मुलाखतीत मान्य केलं होतं. आता आपण सगळं सोडून नवी सुरुवात करण्यास तयार आहे. कोणत्याही अटीवर काम करेन असं तो म्हणाला होता.
4/ 6
विनोद कांबळीच्या कारकिर्दीचा आलेख जितका वेगाने वरती गेला तितकाच वेगाने तो खालीही आला. घरेलू क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबत त्याने १९९८ मध्ये हॅरिस शिल्ड स्कूल टुर्नामेंटमध्ये ६६४ धावांची भागिदारी करून विश्वविक्रम केला होता.
5/ 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केल्यानंतर धावांचा पाऊस पाडला होता. सर्वात वेगवान १ हजार कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याने केला होता. १४ डावातच त्याने हा टप्पा ओलांडला होता. त्याचा हा विक्रम गेल्या २६ वर्षांपासून अबाधित आहे.
6/ 6
विनोद कांबळीचं पहिलं लग्न गर्लफ्रेंड नोएला लुईससोबत झालं होतं. त्यानतंर त्याच्या आयुष्यात मॉडेल हेविट ही आली. मुलाच्या जन्मानंतर ४ वर्षांनी दोघांनी लग्न केलं होतं.