Diego Maradona : 10 नंबरच्या जर्सीतला Hand of God गेला देवाघरी! शतकातल्या महान खेळाडूची 60 फोटोतून उलगडणारी भावुक गोष्ट
महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं बुधवारी निधन झालं. दिएगो अमांडो मॅराडोना हे अर्जेंटानाचेच नव्हे तर जगातले महान फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात.


शतकातला महान खेळाडू अशी ओळख निर्माण करणारा फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना बुधवारी कालवश झाला. All Photos AFP


आज सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या स्पर्धेत असणाऱ्या अनेक खेळाडूंनी मॅराडोना यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पाहून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यामध्ये लिओनेल मेस्सी हा त्यातला एक.


इटलीमधल्या नापोली या प्रसिद्ध फुटबॉल क्लबने मॅराडोना यांच्या सन्मानार्थ ही 10 नंबरची जर्सीच रिटायर केली.


अंमली पदार्थांचं सेवन, दारू, डिप्रेशन, स्ट्रेस अशा अनेक कारणांनी मॅराडोना यांचं वैयक्तिक आयुष्य अस्थिर होतं.


1994 च्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या वेळी मात्र या महान फुटबॉलपटूला मानहानीकारक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं होतं. बंदी असलेलं उत्तेजक (Banned Substance)घेतल्याने ही कारवाई करण्यात आली होती.


1986 च्या वर्ल्ड कपमध्ये मॅराडोना यांचे दोन गोल आजही सर्वांत लक्षणीय गोल म्हणून पाहिजे जातात. त्यातला 'Hand of God' म्हणून हाताने मारलेला एक गोल पंचांनी मान्य केला होता.