IND vs ENG : उमेश यादव टीममध्ये, ऑस्ट्रेलियात विजय मिळवून देणारा खेळाडू बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टआधी (India vs England) उमेश यादव (Umesh Yadav) फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे, त्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे, तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ला टीममधून बाहेर करण्यात आलं आहे.


टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवचं पुन्हा एकदा भारतीय टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ऍडलेड टेस्टमध्ये दुखापत झाल्यानंतर उमेश यादव टीमच्याबाहेर होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टलाही उमेश यादव मुकला होता. पण आता पुन्हा एकदा उमेश यादवला संधी मिळाली आहे.


उमेश यादवची रविवारी फिटनेस टेस्ट झाली. या फिटनेस टेस्टमध्ये तो सहज पास झाला. यानंतर उमेश यादवला शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ऐवजी टीममध्ये संधी देण्यात आली. तर शार्दुलला टेस्ट टीममधून रिलीज करण्यात आलं आहे. शार्दुल ठाकूर आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुल भारताच्या विजयाचा शिल्पकार होता. या टेस्टमध्ये त्याने 7 विकेट घेत अर्धशतकही केलं होतं. यामुळे भारताचा ऐतिहासिक विजय झाला होता. यानंतर शार्दुलला भारतीय टीममध्ये जागा मिळाली नव्हती. (Photo- AP)


शार्दुल ठाकूर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी अहमदाबादवरून जयपूरला पोहोचला आहे. मुंबईच्या टीममध्ये पोहोचण्यासाठी शार्दुलने 10 तासांचा प्रवास केला. (Photo- AP)


उमेश यादवची भारतीय टीममध्ये निवड झाली असली, तरी त्याला तिसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अहमदाबादची खेळपट्टी स्पिनरना अनुकूल असेल, त्यामुळे भारत तीन स्पिनरना घेऊन खेळेल. त्यामुळे इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोन फास्ट बॉलरनाच संधी मिळू शकते. (Umesh Yadav Instagram)