जगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेलं बीसीसीआय (BCCI) प्रशिक्षकांनाही सर्वाधिक पगार देते. टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) जगातले सर्वाधिक पगार मिळवणारे क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत. सर्वाधिक पगार मिळणाऱ्या टॉप-5 प्रशिक्षकांमध्ये पाकिस्तानचा प्रशिक्षक मिसबाह उल हक याचाही समावेश आहे.
श्रीलंकेचे प्रशिक्षक मिकी आर्थर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. मिकी आर्थर वर्षाला 3.44 कोटी रुपये कमावतात. याआधी ते पाकिस्तान टीमचे प्रशिक्षक होते. श्रीलंका टीमने मागच्या चार वर्षात नऊ कर्णधार बदलले आहेत. सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे खेळाडूंसोबत करारावरून वाद सुरू आहेत, पण आर्थरसोबतचा त्यांचा करार सुरक्षित आहे.