Home » photogallery » sport » TOKYO OLYMPICS 2020 NEERAJ CHOPRA GOLD MILKHA SINGH SON JEEV MILKHA SINGH SAID DAD IS CRYING UP ABOVE OD
Tokyo Olympics : नीरज चोप्रानं पूर्ण केली मिल्खा सिंग यांची इच्छा, मुलानं दिली भावुक प्रतिक्रिया
भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारात भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्या मुलानं भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
|
1/ 5
मुंबई, 8 ऑगस्ट : नीरज चोप्रानं भारताला एथलेटिक्समध्ये पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. त्याने भालाफेक स्पर्धेत 87.58 मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल पटकावले. नीरजनं हे मेडल महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना अर्पण केले आहे. (AP)
2/ 5
नीरजनं हे मेडल ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या जवळ आलेल्या खेळाडूंना समर्पित केलं. यामध्ये मिल्खा सिंगसह पीटी उषा यांचा समावेश आहे. (AFP)
3/ 5
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा सिंह याने ट्विट केलंय. 'बाबा वर रडत आहेत. खूप जबरदस्त कामगिरी नीरज चोप्रा. बाबांना या क्षणाची कित्येत वर्षांपासून प्रतीक्षा होती.' अशी भावुक प्रतिक्रिया त्याने दिली आहे. (AFP)
4/ 5
'भारताला एथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळावं हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. मी सध्या रडत आहे. मला खात्री आहे की वर बाबा देखील रडत असतील. या कामगिरीबद्दल खूप आाभार'
5/ 5
ऑलिम्पिक मेडलसह मिल्खा सिंग यांची भेट घेण्याची नीरज चोप्राची इच्छा होती. पण, मिल्खा सिंग यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसनं निधन झाले आहे.