भारताची जर्मनीच्या विरुद्ध सुरुवात खराब झाली. जर्मनीनं पहिल्या क्वार्टरमध्ये गोल केला. त्यानंतर भारताने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचं वर्चस्व होतं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंहनं गोल करत भारताला बरोबरीत आणले. (फोटो : AP)
रुपिंदर सिंहनं गोल केल्यानंतर पाच मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं भारतासाठी पाचवा गोल केला. सिमरनजीतचा हा मॅचमधील दुसरा गोल होता. हा गोल झाल्यानंतर भारताकडे 5-3 अशी आघाडी होती. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं एक गोल करत ही आघाडी कमी केली. पण भारतीय टीमनं अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवत ब्रॉन्झ मेडल पटकावले. (फोटो : AP)