ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने एशेस सीरिजआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेनवर एका मुलीला अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप आहे. 2017 साली टीम पेनने हे कृत्य केलं होतं. मेसेज व्हायरल झाल्यानंतर टीम पेनने आपली चूक स्वीकारली आहे, तसंच माफीही मागितली आहे, पण या घटनेमुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेटपटूंच्या सेक्स स्कॅण्डलची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक क्रिकेटपटू यात फसले आहेत.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी अतीक-उज-जमानन्द आणि हसन रझा यांना काही मुलींसोबत हॉटेल रूममध्ये पकडलं गेलं होतं. या मुली सही घेण्यासाठी रूममध्ये आल्या होत्या, असं तिघांनी सांगितलं, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर कारवाई केली. केनियामधल्या आयीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं. फोटो- @SAfridiOfficial)
इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनचं नावही अशाच एका प्रकरणात समोर आलं होतं. प्लेबॉय मॉडेल वेनेस निम्मोला पीटरसनने डेट केलं आणि एक एसएमएस करून सोडून दिलं. ब्रेकअपमुळे नाराज झालेल्या निम्मोने पीटरसनवर धक्कादायक आरोप केले. पीटरसन सेक्ससाठी आसुसलेला होता आणि संपूर्ण दिवस मला त्रास द्यायचा, असा आरोप निम्मोने केला होता. (Kevin Pietersen/Instagram)
जगातल्या सगळ्यात महान ऑलराऊंडरपैकी एक असलेल्या इयन बोथम यांचं वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त होतं. बोथम यांच्यावर पत्नीला धोका दिल्याचा आरोप झाला. बोथम यांचं ऑस्ट्रेलियन वेट्रेससोबत अफेयर होतं, पण 1980 च्या दशकात माजी मिस बारबाडोस लिंडी फील्डसोबतच्या बोथम यांच्या नात्यामुळे क्रिकेट जगतात वादळ आलं होतं. (Ian Botham)
हमीजा मुख्तार नावाच्या महिलेनं पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. बाबर माझ्यासोबत शाळेत होता, त्याने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि माझं शोषण केलं. जेव्हा मी लग्नाबद्दल बोलायला लागले तेव्हा त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. बाबर जेव्हा क्रिकेटपटू होण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा आपण त्याच्यावर लाखो रुपये खर्च केले, असा दावा हमीजा मुख्तार या महिलेनं केलं. (Babar Azam)
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीचं लग्न शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी ठरलं आहे. याआधी शाहिन आफ्रिदीवरही अशाचप्रकारचे आरोप झाले. शाहिन आफ्रिदी कायम मुलींसोबत फ्लर्ट करतो. तो आपल्या लोकप्रियतेचा वापर मुलींना फसवण्यासाठी करतो, आणि मग त्यांच्या शरिराशी खेळतो, असा आरोप फरीहा नावाच्या महिलेनं केला. (Shaheen Afridi/Instagram)
हर्षल गिब्जने आपली आत्मचरित्र टू द पॉईंट मध्ये आपल्या लैंगिक जीवनाबाबत गौप्यस्फोट केले. माझ्या बाजूला पलंगावर झोपलेल्या मुलीमुळे मला शतक करण्याची प्रेरणा मिळाली. ती हॉटेलमध्ये काम करायची, जिकडे माझी आणि तिची मैत्री झाली. ती माझी लकी चार्म होती, असं हर्षल गिब्ज त्याच्या आत्मचरित्रात म्हणाला. (Herschelle Gibbs/Instagram)
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर डॅरेल टफीही सेक्स स्कॅण्डल प्रकरणात अडकला होता. क्राईस्ट चर्चच्या दुकानात डॅरेल टफी एका सेल्स वुमनसोबत आक्षेपार्ह परिस्थितीमध्ये आढळला. याचं व्हिडिओ शूटिंग दोन इंग्लिश पर्यटकांनी केलं होतं. या घटनेनंतर इंग्लिश पर्यटक पुन्हा कधीच समोर आले नाहीत, तसंच या महिलेनेही आपण डॅरेल टफीला कधीच भेटलो नसल्याचा दावा केला. (Darell Tuffy)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ल्यूक पॉमर्सबॅकवर आयपीएल 2012 साली आरसीबीसोबत खेळत असताना लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. अमेरिकन नागरिक जोहल हमीदसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटकही केली. यानंतर आरसीबीनेही पॉमर्सबॅकचं निलंबन केलं. ल्यूक आणि त्याच्या मित्रांनी आम्हाला ड्रिंक्स घेण्यासाठी बोलावलं आणि आमच्यासोबत गैरव्यवहार केला. ल्यूकच्या होणाऱ्या बायकोने हस्तक्षेप केला तेव्हा, त्याने तिलाही मारहाण केली, असा आरोप महिलांनी केला. (Luke Pomersbach)